सणसवाडी (ता.शिरूर) येथील दिपक आनंदराव दरेकर व विकास नितीन दरेकर यांचे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय केलेले कार्य व कामगारांसाठी असणारी धडपड पाहत राष्ट्रीय कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर यांनी दिपक दरेकर यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी तर विकास दरेकर यांची पुणे जिल्हा सचिव पदी नियुक्ती करत त्यांना नियुक्तीपत्र देवून सन्मानित केले.यावेळी राष्ट्रीय कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर,उपाध्यक्ष गोरख गव्हाणे, आशिफ शेख,दरेकर वाडीचे सरपंच विक्रम दरेकर,हिरामण दरेकर आदी उपस्थित होते.
कामगारांना नेहमी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी अतोनात प्रयत्न करणार असून त्यांना विविध सेवासुविधा मिळाव्यात या साठी अथक परिश्रम करणार असल्याचे नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस दिपक दरेकर यांनी सांगितले.
तर कामगारांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त पुणे जिल्हा सचिव विकास दरेकर यांनी या वेळी सांगितले.