सुनील भंडारे पाटील
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढु बुद्रुक (तालुका शिरूर) ते कोरेगाव भीमा या तीन किलोमीटरच्या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम चालू आहे, बरीचशी कामे अजून प्रलंबित असून रस्त्याचा कामाचा दर्जा कमी असल्याने या रस्त्यावर अचानकच खड्डे पडू लागली आहेत,
संबंधित रस्त्यावर प्रवाशांची व वाहतुकीची वर्दळ असते, त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत "धर्मवीर शंभूराजे" समाधी स्थळ वढू बुद्रुक या ठिकाणी संपूर्ण राज्यातून तसेच देशातून शंभू भक्तांची येजा असते, तसेच परिसरातील बागायती शेती क्षेत्र याच्याशी निगडित अनेक शेतमाल वाहतूक, प्रवासी वाहतूक, औद्योगिक वाहतूक, मोठी रहदारी, प्रवासी वाहतूक यामुळे हा रस्ता महत्त्वाचा असल्याकारणाने गेल्या काही महिन्यांपूर्वी हा रस्ता नवीन करण्याचे काम चालू झाले, अजून काही प्रलंबित कामे आहेत, अशातच माहेर संस्थेच्या समोर खड्डा पडल्याने हा ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे, यावरून रस्त्याचा कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची चर्चा सध्या ग्रामस्थांमध्ये नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे,
रस्त्याच्या कामाचे ठेकेदार शितोळे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही