कुणी संत वा देव बनणे एवढे सोपे नव्हे, पण माणुस बनलं तरी फार झालं - हभप डॉ सुहास फडतरे

Bharari News
0
सणसवाडी - ज्ञानेश्वर मिडगुले
      कुणी संत बनण्याचा प्रयत्न करू नका, ते सोपं नसतं . तुम्ही देवही बनू शकणार नाही , पण माणूस किंवा देवमाणूस नक्की बनू शकता, असे विचार डॉ सुहास फडतरे यांनी सणसवाडी येथे कै.नामदेव हरगुडे यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमीत आयोजीत किर्तनात मांडले, 
पतित ते राशी शरण आलो चरणापाशी , तारीयले भक्त न कळे तुझा अंत , थोर मी पतीत पांडुरंगा , ' या तुकोबारायांच्या अभंगावर बोलताना ' कर भला सो हो भला ' न्यायाने सुखी जिवणाचे सुत्र सांगितले . आयुष्यात तुम्ही किती जणांची मदत घेतली पेक्षा तुम्ही किती लोकांना मदत केल्याचा आकडा जास्त झाल्यासच सुखी असाल .फडतरे महाराजांचा सन्मान दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदिनाथ हरगुडे सिताराम गायकवाड व नरसिंग काळे यांनी केला .   
गायक वादक दिक्षीत, बाळासो मोरे , हभप विकास जाधव , सप्ताह मंडळाचे अध्यक्ष कांचन , काळूराम हरगुडे,शेळके , शिंदे शिवले ,विणेकरी सुदाम दरेकर व वारकऱ्यांचा सत्कार मा उपसभापती आनंदराव हरगुडे, मा. उपसरपंच दता हरगुडे , शिवाजी दरेकर , नवनाथ हरगुडे, तुकाराम दरेकर , पो.पा. हिरामण दरेकर , अध्यक्ष रंगनाथ हरगुडे , मा चेअरमन गोरख दरेकर , बापुसो हरगुडे , दिंडी . मंडळाचे'उपाध्यक्ष रामदास आप्पा दरेकर , उपसरपंच दतात्रय हरगुडे , पैं बाबासो दरेकर यांचे हस्ते झाला . बंधू शिवाजी हरगुडे यांनी प्रास्ताविकात ग्रंथ वा गाथा वाचत गात रहा असे सुतोवाच केले . दिलीप , गणेश , सुनिल हरगुडे यांनी नियोजन केले . सुरज दरेकर यांनी सुत्रसंचलन तर उपसभापती आनंदराव हरगुडे यांनी आभार प्रदर्शन केले . महाप्रसादाने पुण्यस्मरणाची सांगता झाली .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!