सुनील भंडारे पाटील
अष्टविनायक दर्शनासाठी चाललेला लक्झरी गाडीचा आज सकाळी साडेसात वाजता हवेली तालुक्यातील फुलगाव येथे अचानक अपघात झाल्याने सुमारे 13 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे,
याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार लक्झरी गाडीच्या माध्यमातून 49 भाविक अष्टविनायक दर्शनासाठी चालले असता आज रविवार दिनांक 21 रोजी सकाळी साडेसात वाजता फुलगाव तेथे एन एस बी शाळेच्या पुढच्या बाजूला आळंदी रस्त्यावर रस्त्याच्या बाजूच्या नाली मध्ये, चारी मध्ये बस उतरल्याने शेजारच्या शेतामध्ये जाऊन गाडी पलटी झाली, त्यामध्ये तेरा जण जखमी झाले असून त्यांना तातडीची सेवा मिळवण्यासाठी नागरिकांनी आटोकाठ प्रयत्न केले,
या ठिकाणी तातडीने चार ॲम्बुलन्स दाखल झाल्या, त्यापैकी एक ॲम्बुलन्स पेशंट घेऊन जाताना, आळंदी रोडवरील वडू खुर्द फाटा, यु कॉर्नर वर पलटी झाली, त्यामध्ये असणारे पेशंट अधिक जखमी झाले, अशा या दुहेरी अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे, पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक टापरे, टेमगिरे करत आहेत,