सुनिल भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (ता शिरूर) येथील ढेरंगे वस्ती जवळील भीमा नदी पात्रात दुपारी दीडच्या दरम्यान पाच ते सात मुले पोहण्यास गेली असता त्यातील गौरव गुरुलींग स्वामी (वय १६),अनुराग विजय मांदळे (वय १६) दोघेही राहणार कोरेगाव भिमा, ढेरंग वस्ती हे दोघे युवक पाण्यामध्ये अचानक पोहताना दिसेनासे झाल्याने ते पाण्यात बुडल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे,
बाकी मुलांनी गावात जावून ग्रामस्थांना कळविले तेव्हा गावातील सोन्या भोकरे,संपत भांडवलकर,बाप्पु भांडवलकर,भाऊ अजगर, तानाजी ढेरंगे व इतर ग्रामस्थांनी पाण्यात जावून त्यांना शोधण्याचा प्रेयत्न केला मात्र ते सापडले नाही.घटनेचही खबर मिळताच सदर ठिकाणी शिक्रापुर पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार,पोलिस अंबलदार अमोल रासकर,मंगेश लांडगे आदी तर अग्निशमन दलाचे जवान व रुग्णवाहिका दाखल झाल्या.दुपारी चार वाजल्या पासून अग्निशमन दलाचे जवान पाण्यात मुलांचा शोध घेण्यास उतरले असून शोध अजून चालू आहे.लोकांची मोठी गर्दी झाली असून अजूनही शोध मोहीम चालू आहे, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण तयार झाले आहे, सद्यस्थितीत उन्हाचे प्रमाण वाढले असून पोहण्यासाठी गेलेल्या मुलांवर पालिकांनी लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे,