राष्ट्रवादीचे नवीन अध्यक्ष कोण, तीन नावे चर्चेत - समाजात चर्चेला उधाण

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
            राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय संस्थापकीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल मंगळवारी राजकारणातून निवृत्ती घेत अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने समाजामध्ये चर्चेला उधान आले असून, आता पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण? या चर्चेला सध्या उधाण आले आहे,        
  गेल्या कित्येक दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुरब्बी व अष्टपैलू नेतृत्व म्हणून पवार साहेबांचे नाव घेतले जाते, काल अचानक त्यांनी आपली भूमिका मांडत राजकारणामधून निवृत्त होण्याचे ठरवल्याने राष्ट्रवादीच्या गोटामध्ये खळबळ उडाली पवार साहेबांना थांबवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी निदर्शने केली, परंतु पवार यांनी आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केल्याने आता राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण या चर्चेला सध्या उधाण आले आहे, राज्याच्या राजकारणामध्ये आगामी निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा,लोकसभा, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभावीपणे निवडणुका लढवण्यासाठी आगामी काळामध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष वर मोठी जबाबदारी असणार आहे, त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण असणार या चर्चेला सध्या समाजामध्ये उधान आले आहे, समाजामध्ये सध्या तीन नावे चर्चेत आहेत अजित दादा पवार, सुप्रिया सुळे, आणि प्रफुल्ल पटेल या तीन नावांची सध्या चर्चा चालू आहे, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने आपली बाजू मांडत आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!