हवेली प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटेकर
गेल्या अनेक वर्षापासुन राजकिय अनास्थेमुळे बंद असलेला थेऊर येथील यशवंत साखर कारखाना सुरू होण्यासाठी
माजी संचालक पांडुरंग अप्पा काळे व त्यांचे पुत्र मुंबई महापौर केसरी पै.दत्ताआबा काळे यांनी सभासदांना विश्वासात घेऊन पुढाकार घेतला आहे. आज साखरसंकुल मध्ये साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन निवडणूक कार्यक्रमसुरू होण्यासाठी सभासद फी 30 लक्ष रुपयांचा धनादेश त्यांनी सुपूर्द केला.
यावेळी मोरेश्वर काळे,लोणी काळभोर चे माजी सरपंच अण्णासाहेब काळभोर,रमेश कुंजीर,विठ्ठल काळे,साहेबराव बांगर,रमेश काळे,सुखराज कुंजीर,गिरीश दांगट,भाऊसाहेब आव्हाले,अॅड अभय दांगट,साहेबराव दांगट आदी सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.
यशवंत साखर कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकरी हा अडचणीत आला,
सभासदांना विश्वासात घेऊन हा कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, शेतकऱ्यांनी कारखाना पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी कंबर कसली असून पुढील दोन महिन्यांमध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊ शकते असा विश्वास साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे
साधारणपणे 1970 ते 2011 पर्यंत हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालू होता चार तालुक्यातील बावीस हजार सभासद व जवळपास एक लाख लोकसंख्या या कारखान्यावर उदरनिर्वाह करत होती अचानकपणे कारखाना बंद पडल्यामुळे यावर अवलंबून असलेल्या सर्व कुटुंबांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आगामी काळात संचालक पदाची निवडणूक घेऊन सर्व संचालक मिळून हा कारखाना सुरू झाल्यास इथेनॉल प्रकल्प ही काळाची गरज असून इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करून हा कारखाना नफ्यात आणला जाईल, प्रामाणिक संचालक मंडळ सर्व शेतकरी बांधवांना पाठीशी घेऊन काम करेल,यशवंत कारखाना नावारूपास आणेल असा विश्वास यावेळी पांडुरंग काळे,पै.दत्ताआबा काळे आणि मोरेश्वर काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.