हवेली प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटेकर
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, शिववृत्त पोलीस मित्र माहिती अधिकार संरक्षण सेना, भारतीय महाक्रांती सेना पत्रकार संरक्षण सेना टाइम्स ऑफ पुणे आयोजित सामाजिक, शैक्षणिक प्रशासकीय सांस्कृतिक सेवेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते,
यावर्षी सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे व उल्लेखनीय कार्य करणारे हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य व पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुभाष पाटोळे यांची लंडन बुक ऑफ रेकॉर्ड या पुरस्कारासाठी निवड समितीने निवड करून एका सच्या कार्यकर्त्याला न्याय दिल्याबद्दल सर्व स्तरातून श्रीकांत पाटोळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
याप्रसंगी श्रीकांत पाटोळे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता,कार्यक्रमाचे निमंत्रक संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश सकुंडे तर कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास पठारे होते प्रसिद्धी प्रमुख सतीश राठोड यांनी निवेदन केले तर स्नेहा कुलकर्णी यांनी आभार मानले