लोणी काळभोर येथे अल्पवयीन मुलांना पोलीस उपनिरीक्षकाकडून जबरदस्त मारहाण
शांततेत वाढदिवस साजरा करत असताना अल्पवयीन मुलांना मारहाण
पोलीसांच्या कृतीबद्दल सर्व थरातून निषेध
लोणी काळभोर प्रतिनिधी - चंद्रकांत दुंडे
लोणी काळभोर (तालुका हवेली) येथे घरासमोर शांततेत वाढदिवस साजरा करत असताना लोणी काळभोर पोलिसांनी अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली असून या पोलिसांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी अर्ज शिवसेनेचे पदाधिकारी संतोष बाबुराव भोसले यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला केला आहे .
याबाबत घडलेली घटना अशी की मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याची सुमारास संतोष भोसले यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचे पुतणे शिवराज भोसले व त्यांचे मित्र यांच्या समावेत भोसले चाळीच्या समोर केक कापत असताना अचानक त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांचे सहकारी आले कोणाला कसलीही कल्पना नसताना त्यांनी अचानक लाठीमार करायला सुरुवात केली व तेथील नागरिक व महिलांना शिवीगाळ करून संतोष भोसले सहकाऱ्यांना फरपटत नेण्याचा प्रयत्न केला त्या लाठी चार्जमध्ये शिवराज भोसले वय वर्षे १७याच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली असून झाली आहे .याबाबत वैभव भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतोष भोसले यांनी केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे यांचा लोणी काळभोर येथे आल्यापासून कार्यकाळ कायमच वादग्रस्त राहिला असून न केलेल्या गुन्ह्यात मुलांना अडकवण्यासाठी त्यांचा हातखंडा असल्याचे नागरिकात चर्चा सुरू आहे . प्रत्येक महापुरुषांच्या जयंती निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत वैभव मोरे यांनी लाठीचार्ज केल्याची चर्चा आता नागरिक करु लागले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना कायदेशीर कारवाई करण्यास आमचा विरोध नव्हता पण एका राजकीय पुढार्याच्या फोनवरून वैभव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप संतोष भोसले व नागरिकांनी केला आहे.