गोरगरीबांच्या मुलांची लग्ने लावून पुण्य मिळवणाऱ्या विकासनानांचा उत्तरोत्तर विकास होत शतायुषी होवो - खासदार अमोल कोल्हे

Bharari News
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
          जनसामान्यांच्या गोरगरीबांच्या मुलांची मोफत लग्ने लावून दुवा मिळणाऱ्या विकासनानांचा उतरोतर विकास होवून शतायुषी होवो , अशी भावना खासदार अमोल कोल्हे यांनी हिवरे येथील मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात वधूवरांना आशिर्वाद देताना व्यक्त केली .   
  येथील उद्योजक विकासनाना शिवाजी गायकवाड हे गेली ६ वर्ष स्वतःच्या वाढदिवसानिमीत मोफत सामुदायीक सोहळ्याचे आयोजन करत आहेत , व यापुढेही त्यांना हे कार्य करण्यासाठी यश लाभो , अशाही शुभेच्छा कोल्हे यांनी दिल्या . यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, पारनेरचे आमदार निलेश लंके, उद्योजक सदाअण्णा पवार, उपसभापती सविता पर्हाड , समता परीषदेचे सोमनाथ भुजबळ , कामगार नेते यशवंत भोसले , भिमाशंकरचे व्हा . चेअरमन प्रदिप वळसे पाटील, सभापती प्रकाश पवार, पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, माजी जि.प सदस्य मंगलदास बांदल , शेखर दादा पाचुंदकर, नंदकुमार पिंगळे , आबाराजे मांढरे, माजी सभापती विश्वास कोहकडे , पै.सुभाष उमाप, शंकर जांभळकर, पं.स सदस्य विक्रम पाचुंदकर , बाळासो नरके, रामदास मांदळे व परीसरातील गावचे पदाधीकारी व ग्रामस्थ उपस्थीत होते . सकाळी चे . शहाजी जाधव , सरपंच शारदा गायकवाड , दिपक खैरे , अमोल जगताप व ग्रामस्थांचे हस्ते शिवप्रतिमा पुजन करून सुपारी फोडून साखर पुडा ,हळदीचा विधी पार पडला . वर्हाडीचे स्नेहभोजनानंतर सनईच्या सुरात मिरवणुक काढून १२ जोडप्यांचा लग्न विधी पार पडला . याचा नगर , वेल्हा, आंबेगाव , पाबळ , कान्हूर , तळेगाव , निमगाव, पिंपरी, भांबर्डे , मुखई , मिडगुलवाडी , पिंपळवाडी , धामारी, वडनेर , करमाळा, अहमदपुर आदी २४ गावचे वधूवर पित्यांनी लाभ घेतला व विकासनानांना धनगर समाजाची घोंगडी व कुऱ्हाड देऊन सन्मान करण्यात आला,यावेळी खासदार अमोल कोल्हे व कार्यकर्त्यांचे उपस्थीतीत केक कापून विकासनानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . आणी मान्यवराचे हस्ते मुलांना सायकल वाटपही करणेत आले .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!