हडपसर पोलीसांकडून ४ दिवसात ४ महत्वाचे तपास

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी
          हडपसर पोलीस स्टेशनच्या वतीने धडाकेबाज कामगिरी चार गंभीर गुन्ह्यांचा तपास,
१) ज्वेलर्स चे हातचलखीने चोरलेले सोने जप्त.
२) नैसर्गिक मत्यूचा बनाव केलेला खून उघडकीस.
३) अनेक गंभिर गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीस अटक.
४) हातभट्टी दारूचा मोठा साठा वाहनासह जप्त.                                                         ज्वेलर्सचे हातचलखीने चोरलेले सोने जप्त.
१) फिर्यादी यांचे लक्ष्मी ज्वलेर्स नावाचे भेकराईनगर हडपसर पुणे येथे दुकान असून दिनांक- ०५/०५/२०२३ रोजी त्यांचे दुकानात तीन महिला व त्यांचेसोबत एक लहान मुलगी येवुन दुकानातील कामगारांना वेगवेगळ्या सोन्याच्या वस्तु दाखवण्यास सांगून, त्यांची नजर चुकवून सोन्याचे नाकातील चमकी वजन १२ ग्रॅम हे हातचलाखीने चोरून नेल्याने हडपसर पोलीस ठाणेस कलम ३८० गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी यांचे दुकानात सीसीटीव्ही फुटेज असल्याने तपासपथक अधिकारी सपोनिरी विजयकुमार शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, अंमलदार शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, अतुल पंधरकर यांनी सीसीटीव्ही पाहीले. त्यामध्ये ३ महिला व त्यांचे सोबत लहान मुलगी दिसली. सीसीटीव्ही मधून दुकानातील आरशामध्ये लहान मुलीने दागिने हातचलाखीने चोरून जिन्स पँन्टमध्ये लपवत असलेबाबत दिसून आले. सीसीटीव्ही पडताळणी करीत असताना मिळालेले फुटेज व आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपी महिला या रिक्षातुन बसून गेलेल्या दिसल्या. तपासपथक टिमने सुमारे ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज हडपसर ते पदमावती सहकारनगर दरम्यान चेक करून आरोपी महिला निष्पन्न करून १) सविता मनोज चव्हाण वय ४७ वर्षे, रा. शिवरामदादा तालीमजवळ, ५० गणेश पेठ पुणे. २) वर्षा योगेश चव्हाण रा. शनि मंदिराशेजारी चव्हाणनगर पुणे. ३) स्नेहा शैलेंद्र पवार वय २५ वर्षे रा. चाळ नं. ३, कृष्णानगर महम्मंदवाडी पुणे. ४) विधीसंघर्षग्रस्त मुलगी यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे केले तपासात त्यांनी दाखल गुन्हा केल्याचे कबुली दिली. आरोपी महिलांकडून सोन्याचे नाकातील चमकी वजन १२ ग्रॅम किं. रू ४५,०००/- चे हस्तगत करण्यात आले आहे... दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.
नैसर्गिक मत्यूचा बनाव केलेला खून उघडकीस.
२) दिनांक ०९/०५/२०२३ रोजी ससुन हॉस्पीटल पुणे येथून हडपसर पोलीस स्टेशनला एमएलसी कळविण्यात आली. त्यामध्ये मयत रवी सुर्यभान क्षिरसागर वय ५१ वर्ष रा. मांजरी पुणे यास दारूचे व्यसन होते व ते राहते घरी बेशुध्द अवस्थेत मिळून आल्याने त्यांना उपचार कामी ससुन हॉस्पीटल येथे आणले असता उपचारपूर्वी डॉक्टारांनी मयत घोषीत केले. मयताचे इनक्वेस्ट पंचनाम्यामध्ये गळ्याजवळ व्रण व पाठीवर मारल्याचे व्रण दिसून आले. डॉक्टरांनी मयताचा गळा दाबलेला व त्याचेवर व्रण असलेले अॅडव्हान्स सर्टीफिकेट दिले.
गुन्ह्याचे तपासात अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, विश्वास डगळे, पोनि.(गुन्हे), हडपसर पोलीस स्टेशन, तपासपथक प्रभारी अधिकारी सपोनिरी. विजयकुमार शिंदे, पोउपनिरी. अविनाश शिंदे आणि सपोनिरी. नानासाहेब जाधव यांनी नियोजन करून मयातचे घरातील लोकांनी धार्मिक विधी उरकल्यानंतर फिर्यादी यांचे घरातील इसमांची चौकशी करीत असताना, मुलगा ओंकार रवि क्षीरसागर वय २७ वर्षे हा वेळोवेळी वेगवेगळी माहीती देत असल्याने त्यास पोलीस ठाणेस घेवून त्याचेकडे अधिक तपास करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी मुलगा याने सांगीतले की, मयत वडील यांनी त्यास शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन काठीने मारहाण करुन गळा दाबून त्याचा खुन केल्याचे सांगीतले. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नानासाहेब जाधव, हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.
अनेक गंभिर गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीस अटक.
३) हडपसर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरिल आरोपी ज्याच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, विनयभंग अशा प्रकारचे अनेक गंभिर गुन्हयांमध्ये पाहीजे असलेला आरोपी आशिष मारुती धणके वय २४ वर्षे, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, पुणे हा फरार झालेला होता. त्यास वेळोवेळी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून येत नव्हता. पोलीस अंमलदार अजित मदने आणि चंद्रकांत रेजीतवाड यांना गोपनीय माहीती मिळाली की, आरोपी हा सध्या लोहारा, धाराशिव या भागात आहे. पोलीस अंमलदार समिर पांडुळे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड आणि कुंडलीक केसकर यांची टिम सदर भागत जावून आरोपीचा शोध घेत असतना आरोपी हा अण्णुर ता. आळंद जिल्हा कर्नाटक येथे गेला असल्याची माहीती मिळाली. मिळालेल्या माहीतीचे आधारे आरोपी नामे आशिष मारुती धणके, वय २४ वर्षे, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, पुणे यास ताब्यात घेण्यात आले. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुशील डमरे, हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.
हातभट्टी दारूचा मोठा साठा वाहनासह जप्त.
४) दिनांक १३/०५/२०२३ रोजी हडपसर पोलीस ठाणे हद्दीत तपासपथकातील अधिकारी पोउपनिरी अविनाश शिंदे / अंमलदार सुशील लोणकर, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अजित मदने, कुंडलीक केसकर असे अवैद्य धंदे बंद अनुषंगाने पेट्रोलींग फिरत असताना, रासगे आळी, हडपसर पुणे येथील मोकळ्या जागेत इसम नामे १) भिमा मारूती गायकवाड वय ३३ वर्ष रा. रासगे आळी शेजारी, पत्र्याचे शेडमध्ये हडपसर पुणे २) विकास संभाजी लिंगायत वय २३ वर्ष रा. सदर यांनी विक्रीकरीता महिंद्रा टेंम्पो मधून आणलेले २५ दारूचे कँन्ड त्यामध्ये ८७५ लिटर गावठी हातभट्टीची दारू सह मिळून आल्याने कारवाई करून किं.रु ५,७५,०००/- चा माल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा व मा.पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ५ विक्रांत देशमुख यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन . अरविंद गोकुळे पुणे शहर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, प्रशांत टोणपे, अजित मदने, रशिद शेख, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजीतवाड यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!