सुनील भंडारे पाटील
सद्यस्थितीत लग्नसराईची धूमधाम जोरात सर्वत्र आपल्याला पाहावयास मिळत आहे, परंतु मराठी तारीख,तिथी,वेळ काढण्यात आलेला मुहूर्त लोकनेत्यांच्या भाषणांमुळे आता फक्त नावापुरता राहिला असून, काढलेला मुहूर्त सुमारे दोन तास उशीर होत आहे, त्यामुळे नवरा - नवरी उपस्थितांना मात्र लग्नाची वाट पहावी लागत आहे,
लग्न म्हणजे दोन मनाचे मिलन, देवा ब्राह्मणांच्या, लोकांच्या साक्षीने नव वधू वर एकमेकाच्या बंधनामध्ये आयुष्यभर साथ देण्याचा सुवर्णक्षण असे महत्त्व असताना लग्नाचे व्यासपीठ म्हणजे लोकनेत्यांना तसेच राजकारण्यांना स्वतःची लाल करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी, भाषण बाजी करण्यासाठी आईते व्यासपीठ मिळत आहे, याचा पुरेपूर उपयोग या मंडळींकडून केला जात आहे, सध्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वच मंगल कार्यालयांमध्ये, आळंदी सारख्या ठिकाणी धर्मशाळांमध्ये लग्नाची धामधुम चालू आहे,
लग्न लावण्यासाठी वधू आणि वर पित्याकडून गोरज मुहूर्त काढलेला असताना प्रमुखांच्या भाषणबाजीमुळे, सत्कारामुळे सुमारे दोन - दोन तास लग्न उशिरा लागली जात आहेत त्यामुळे ज्यांचे लग्न आहे ते नवरा नवरी, लग्नाला येणारे सगळे आप्तेष्ट नातेवाईक वैतागून जाण्याचा प्रकार घडत आहे, लग्न जर मुहूर्तावर लागत नसेल तर मग असा मुहूर्त काढायचा कशाला असा प्रश्न विचारला जात आहे,