धक्कादायक...! गोडाऊनला लागलेल्या आगीत होरपळून तिघांचा मृत्यू वाघोली मधील घटना

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
       वाघोली (तालुका हवेली) येथील साईसत्यम पार्क मधील गणेश नगर येथे असणाऱ्या डेकोरेशनच्या गोडावूनला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळ प्रयत्न शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.बिजेन पात्रा (अंदाजे वय २८), विश्वास सेन (अंदाजे वय ३३), कमल (अंदाजे २९, सर्व राहणार पाचशिम बंगाल पूर्व, मैथानीपूर) असे आगीमध्ये मृत्यु झालेल्यांची नावे आहेत.    
  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे - नगर रोडवर वाघोलीतील साईसत्यम पार्क येथील गणेश नगर तेथे डेकोरेशनचे गोडाऊन आहे रात्री या गोडवून मध्ये  १२ कामगार जेवण करत होते. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे कामगार भेदरले. काही कामगार बाहेर पळाले. एकाने गॅस सिलेंडर फुटण्याच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी सिलेंडर घेवून पाण्याच्या टाकीत उडी मारली त्यामूळे त्याचा बीजन पात्रा याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर दोघांचा होरपळून मृत्यू झाला. आग एवढी भीषण होती की सर्व जळून खाक झाले. कोटि रुपयांचे यामधे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी  अग्निशमन दलाच्या गाड्या  दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागलेल्या गोडाउनच्या शेजारीच इंडियन गॅसचे गोडावउन आहे. या गोडाऊन मध्ये  ४०० सिलेंडरने भरलेल्या गाड्या होत्या. त्याचबरोबर लागतच साई बालाजी असून आगीमुळे सोसायटीच्या काचांना तडे गेले व पिव्हीसी पाईपांचे नुकसान झाले आहे. तीन गॅस सिलिंडरचे स्फोट  झाल्याने आगीने आणखीनच रौद्ररूप धारण केले.    
  पिएमआरडीए व महानगर पालिका मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आगीव नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांच्या यश आले. माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे व स्थानिक नागिकांनी पाण्याचे टँकरची तात्काळ पोहच केल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली . दोन जेसिबी सहायाने भिंती अग्नीशमन दलाचे जवानाने आगीवर नियंत्रण मिळविले. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी धाव घेतली. मृतदेह शुभविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पवार करत आहेत,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!