सुनील भंडारे पाटील
एकेकाळी मुळा मुठा नदीच्या काठावर असलेली गावे, गुराखी नदीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करत होती, त्या नदीची आज काय अवस्था आहे, घाण पाणी व त्यावर दाट कांजवणाचा थर यामुळे जलचर प्राण्यांचे अस्तित्व देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहे,
दरवर्षी पावसाळ्यामध्ये नदीला आलेल्या पुरामध्ये सर्व घाण, व कांजवन वनस्पती पूर्णपणे वाहून जाते नदी स्वच्छ होते, परंतु मधल्या काळात वाढते शहरीकरण, रहदारी यामधील सांडपाणी नदीमध्ये सोडल्यामुळे नदीचे पाणी अतिशय प्रदूषित झाले आहे, या प्रदूषित पाण्यावर जलपर्णी चा थर देखील नदीत मावेना असा झाला आहे,
कांजवन ही वनस्पती एवढी दाट वाढली आहे की, नदीच्या पाण्याचा ठाव ठिकाणा लागत नाही, शिवाय पाण्याचा खतासारखा उपयोग होत असल्याने आपण छायाचित्रात पाहू शकतो की हिरवीगार व किती तेज आहे या जलपर्णीला, त्याचा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेती पिकावर परिणाम होऊ लागला आहे, तसेच माश्याच्या ठराविक जाती वगळता इतर मासे संपुष्टात आले आहेत, या दूषित पाण्याचे इतरही दुष्परिणाम होऊ लागले आहेत, शासनाने मुळा मुठा नदीवरील कांजवन जलपर्णी हटवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,