सुनील भंडारे पाटील
हल्ली कुठल्याही निवडणूक मध्ये सहभाग घेण्यासाठी किंवा यश संपादन करण्यासाठी उमेदवाराला जनतेची खूप काळजी घ्यावी लागते, परंतु हवेली मध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे, एका मोठ्या नेत्याकडून जनतेच्या व पत्रकारांच्या संपर्काला मात्र अजिबात किंमत दिली जात नाही,
ग्रामपंचायती पासून देशाच्या राजकारणामध्ये ज्या व्यक्तीला राजकारणात टीकायची असेल त्या व्यक्तीने समाजातील सर्व स्तरांची काळजी घेणे गरजेचे आहे, पूर्वीपेक्षा राजकारणाची आता व्याख्या वेगळी झाली असून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी 24 तास जनतेच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे असे असताना हवेली मधील बडया नेत्याच्या संपर्कात राहण्यासाठी किंवा आणि अडचणी सोडवण्यासाठी लोकांनी तसेच पत्रकारांनी कधीही संपर्क साधला तरी प्रत्यक्ष भेट होणे तर मुश्किलच, फोन देखील उचलला जात नाही, कधीतरी फोन उचलण्यासाठी पर्याय व्यक्ती किंवा मेसेज चा वापर केला जातो, अशाने जनतेच्या प्रश्नांचं काय? या उलट हवेली मधील अगदी तळागाळातील नेत्यांपासून बड्या नेत्यांपर्यंत कोणाकडून जनतेला व पत्रकारांना अशी वागणूक दिली जात नाही, हवेलीतील सर्वच स्तरामधून नाराजी व्यक्त होत आहे, मग आगामी निवडणुकांचे काय जनता साथ देईल की नाही देईल हे चित्र आता भविष्यात स्पष्ट होईल,