सुनील भंडारे पाटील
वाघोली (तालुका हवेली) पुणे येथील तलाठी कार्यालयात काम करणाऱ्या दोन खाजगी इसमावर लाच मागणी प्रकरणी कारवाई करण्यात आली, ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केली,
लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर 447/2023, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अ,12, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, भाऊसाहेब भिकाजी गिरी वय 56 राहणार साईबालाजी आव्हाळवाडी, वाघोली पुणे (खाजगी इसम), त्याचप्रमाणे संजय मारुती लगड वय 53 वर्ष, राहणार साईनगर लोहगाव पुणे ( खाजगी इसम ), यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून, तक्रारदार याने पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची नोंद उताऱ्यावर घेण्यासाठी वाघोली तलाठी कार्यालय येथे रीतसर अर्ज केला होता, तलाठी कार्यालय वाघोली येथे मदतनीस म्हणून काम करणारे लगड व गिरी यांनी तलाठ्याकडून काम करून घेण्यासाठी लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती, सदर तक्रारीची पडताळणी केली असता लगड व गिरी यांनी तलाठी पटांगे यांच्यासाठी 45 हजार रुपये व स्वतःसाठी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली असे सिद्ध झाल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे,
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शकानाने पथकाने केली