नायगाव फाटा (तालुका हवेली) येथील हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास शिरूर हवेली मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली,
हवेली तालुक्याच्या पूर्वपट्ट्या मध्ये शेती तसेच उद्योग व्यवसायात अर्थ सहाय्य तसेच त्यांची भरभराट करण्यासाठी अग्रगण्य म्हणून या संस्थेची सर्वत्र चर्चा आहे, संस्थेची वाटचाल चांगली असून प्रगतीच्या दिशेकडे वाटचाल आहे यापुढे देखील हनुमंतराव चौधरी पतसंस्थेची अशीच प्रगती होत राहो असे आढळराव यांनी सांगितले, तसेच पुढील वाटचालीसाठी संस्थेला शुभेच्छा दिल्या, यावेळी खासदार यांचे समवेत विपुल शितोळे, अनिकेत कांचन, राहुल चौधरी, व इतर सहकारी उपस्थित होते,