सुनील भंडारे पाटील
शिरूर शहरांमध्ये मुलांनी औरंगजेबा बद्दल काही आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर ठेवल्याने तणावपूर्ण वातावरण तयार झाले असून या मुलांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
याबाबतीत शिरूर पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार 1) रेहान आसिफ काझी, व इतर 4 विधी संघर्षित बालक सर्व राहणार शिरूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या पाच जणांकडील आपापले इंस्टाग्राम अकाउंट वर औरंगजेबाचा फोटो असलेला व्हिडिओ व औरंगजेबाचा फोटो हातात घेऊन नाचणारे मुलांचा आक्षेपाऱ्ह व्हिडिओची स्टोरी ठेवून तसेच औरंगजेबाच्या फोटोला " बाप तो बाप रहेगा " असे बॅकग्राऊंड म्युझिक दिलेला व्हिडिओ स्टोरीला ठेवून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असे वर्तन केले आहे, त्यांचे विरुद्ध आयपीसी 505(2),34, कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदरची फिर्याद शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पोपट गोपाळे यांनी दिली असून चार अल्पवयीन मुलावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच त्यांच्या पालकांना समज देण्यात आली आहे, एक सज्ञान आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत हे करत आहेत,