संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान आज करत आहे या पार्श्वभूमीवर वैष्णव मेळा आळंदीत भरला होता आळंदीत वर्षानुवर्षी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे लाखो वारकरी वारीला येतात पण कुठेही गालबोट लागत नाही मात्र पोलिसांच्या हेकेकोरपणामुळे आज आळंदीत गालबोट लागलेले आहे. वारकऱ्यांवर अक्षरशा गुन्हेगार असल्यासारखे प्रमाणे लाठीचार्ज करण्यात आला.
विठू माऊली विठू माऊली म्हणत वारकरी नेहमीप्रमाणे महाद्वारात जमा होतो आणि प्रस्थान सोहळा जितक्या जवळून पाहता येईल तितक्या जवळून पाण्याचा प्रयत्न करतात परंतु पोलीस प्रशासनाने यावेळी महाद्वार संपूर्ण मोकळा ठेवला.शेकडे वर्षाची परंपरा आत्ता पर्यंत कधीही गर्दी असताना. गालबोट लागले नाही. तसेच वारकऱ्यांकडून कायदा हातात घेतला गेला नाही. या सर्वांची जाणीव प्रशासनाला वारंवार करून देऊन. सुद्धा प्रशासन आणि देवस्थान यांनी मात्र याकडे कानाडोळा केला. यामध्ये देवस्थानही तितकेच गुन्हेगार आहेत. जितके पोलीस. कारण देवस्थानलाही याबाबत संपूर्ण माहिती असते की प्रस्तान सोहळा हा भावनेचा विषय असतो.यामध्ये कशा प्रमाणे भाविक येतात .याची जाण पोलिसांना देवस्थानने करून द्यावी.ही आग्रही भूमिका होती. परंतु सोहळा आदर्श करण्याच्या नावाखाली आज झालेला लाठी चार्ज ही खूप निंदनीय बाब आहे. वारकरी संप्रदायाच्या बाबतीत मानावी लागेल. पोलिसांनी केलेला लाठीच्या जखमा या मनावर झालेल्या आहेत आणि या कधी भरुन निघतील याबाबत मात्र साशंकता आहे.