सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
श्री म्हाळसाकांत ट्रस्ट चिंचोली मोराची व शास्ताबाद ग्रामस्थ आयोजित दिंडीचे आज गावातून मिरवणुकीने खंडोबा मंदिरापर्यत येवून वारकऱ्यांचा सत्कार करून महाप्रसादानंतर पिंपळनेरकडे प्रस्थान झाले . महाराष्ट्रभरातून हजारो दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपुर कडे नामघोषात प्रस्थान करत आहे.
ज्ञानोबा तुकोबांरायांचे दिंड्याचे दि.१० व ११ रोजी देहुआळंदीहून प्रस्थान होवून आज त्या पुण्यातून बाहेर पडत असताना संत मांदियाळीतील शेवटचे संत तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबाराय यांची आज पिंपळनेर येथून दिंडी निघून राळेगणसिद्धी वाडेगव्हाण देवदैठण बेलवंडी श्रीगोंदा सिद्धटेक भांबोरा स्वामी चिंचोली. लोणी देवकर टेंभुर्णी परिते करकम गुरसाळे मार्गे पंढरपूरला दि २८ रोजी रवाना होते . नाथांचे पैठण, मुक्ताईनगरचे संत मुक्ताबाई आदी दिंड्याचे नंतर ही निळोबारायांची दिंडी शिस्तबद्ध रीत्या मार्गक्रमण करत आहे व दिंडीत कोणत्याही प्रकारचे व्यसन करणारास प्रवेश नाही व विशेष म्हणजे या दिंडीमध्ये १०५ वर्षाचे वयोवृद्ध वारकरी हभप अंबर्षी महाराज हे मार्गदर्शक असून नित्य नामघोष भजन किर्तन प्रवचन व हरीपाठ सांजसकाळ दोनदा होतो . मानवी मनातील रागलोभ मोह कमी करून स्नेह पावित्र्य भक्तीभाव आध्यात्म परमार्थ वाढीसाठी वर्षातून येणारी ही दिंडी सोहळ्याची पर्वणी पुण्यवान वा भाग्यवंतासच प्राप्त होते. आणी निळोबारायांचे रथास बैलजोडीचा मान दुसऱ्यांदा चिंचोली मोराचीस मिळाल्याने म्हाळसाकांत ट्रस्ट व ग्रामस्थांनी लाखो गुंतवून गावची स्वतःची बैलजोडी खरेदी केली हे विशेष
निळोबारायांचे या दिंडी सोहळ्यात पारनेर, शिरूर, आंबेगाव, श्रीगोंदा तालुक्यातील शंभरावर गावच्या दिंड्याचा सहभाग असतो .