लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे
पुण्यनगरीचा दाेन दिवसाचा मुक्कामनंतर
संत श्री तुकाराम महाराजांचा ३३८ वा पालखी बुधवार दि. १४ जुन लोणी काळभोर च्या दिशेने मार्गस्थ झाला. ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामी पालखी साेहळ्याचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. ग्रामस्थां समवेत विविध संस्था,संघटना व मंडळांचे कार्यकर्ते व पंचक्राेशीतील नागरिकांनी पालखी मार्गावर भव्य रांगोळी काढुन, फुलांच्या वर्षावात,ढाेल ताशाच्या गजरात जोरदार केले.
"ज्ञानोबा तुकाराम "..च्या गजरात टाळ मृदुंगाच्या निनादात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीने पुणे येथील निवडूंग्या विठाेबा मंदीरातुन आज सकाळी पालखी साेहळा पुलगेट मार्गे हडपसर येथे आला.हडपसर गाडीतळ येथे दुपारचा विसावा घेऊन साेहळ्याचे पुणे साेलापुर महामार्गावरुन लाेणी काळभाेर कडे मार्ग क्रमन केले. सायंकाळी ५ वा. सुमारास कदम-वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश केला त्यावेळी कवडीपाट टोलनाका येथे कदमवाकवस्तीच्या सरपंच चित्तरंजन गायकवाड व ग्रामपंचायत सदस्यांनी यांनी अल्पोपहार वाटप करुन पालखीचे स्वागत केले. लोणी स्टेशन डॉक्टर असोसिएशन च्यया वतीने मोफत आरोग्य सुुुविधा उपलब्ध करण्यात आल्या.
सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास पालखी साेहळ्याने लाेणी काळभाेर मध्ये प्रवेश केला. यंदाच्या पालखी सोहळा लोणी काळभोर येथे मुक्कामी नव्हता ,परंतु ग्रामस्थांच्या आग्रही मागणीमुळे गेल्या ७० वर्षाची पालखी मुक्कामाची परंपरा अबाधित राहिली त्यामुळे नेहमीपेक्षा मोठ्या उत्साहात भक्तीभावाने लोणी काळभोर वासीयांनी पालखीचे स्वागत केले
यावेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिलीप काळभोर, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, सरपंच योगेश काळभोर यांनी पालखीचे स्वागत केले . त्या वेळी सर्व वारकरी टाळ मृदंगाच्या तालावर नाचत हाेते.काहीनी मानवी मनाेरे उभारुन आपला आनंद व्यक्त केला.काही जण फुगड्या खेळत हाेते.त्याच उत्साहात ग्रामस्थांनी त्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत केले.
गावातील दत्त मंदीरानजीक मा. पंचायत समिती उपसभापती युगंधर काळभोर यांनी स्वागत केले.जुन्या अंबरनाथ भाजी मंडई जवळ अंबरनाथ लोकसेवा प्रतिष्ठान, शिवसेना शाखा लोणी काळभोर,महीला आघाडीच्या श्रद्धा कदम व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात पालखीचे स्वागत केले या ठिकाणी मा. पं.स.सदस्य रत्नाबाई भाेसले,जिल्हा संघटक रमेश भाेसले, संतोष भोसले, योगेश उबाळे, तुषार कुंभार, प्रशांत पाटील, राहुल महानगर, कृष्णा राऊत, युवासेनेचे श्रेयश वलटे ,अजय माने, कुमार ढवळे,विकास पवार,दादा पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यावेळी एकुण ३५० दिंड्यांच्या समावेश असुन पालखीच्या पुढे ३० व मागे ३२० दिंडींचा असुन यावेळी निरामय वारी दिंडीचे चे नव्याने आयोजन केले आहे यामध्ये प्रत्येक दिंडीमध्ये वारीदरम्यान वारक-यांच्या आरोग्य सेवेसाठी एक डॉक्टर आहे.अशी माहीती पालखी सोहळा अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे व सोहळा प्रमुख अजित मोरे व विशाल मोरे यांनी दिली.
संत तुकाराम महाराजांची पालखी गावातील श्री विठ्ठल मंदीरात मुक्काम स्थळी पाेहाेचल्या नंतर आरती झाली यानंतर सर्व वारक-यांसाठी गावातील विविध तरुण मंडळे,संस्थांनी,घरोघरी भोजनाची व्यवस्था होती.भजन,कीर्तन,प्रवचन व हरिनामाच्या जागरामुळे लाेणी काळभाेर परिसर भक्तिमय हाेऊन गेला हाेता.लाेणी काळभाेर प्राथमिक आराेग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.जे. जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखी मुकामाच्या ठिकाणी आराेग्य सेवे साठी बाह्यरुग्ण
कक्ष उभारण्यात आले आहे.वारक-यांसाठी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती बाजार मैदान येथे प्रशासनाच्या वतीने ८४५ मोबाईल स्वच्छता गृहे उभारण्यात आली.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा , सहा. आयुक्त अश्विनी राख मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली या पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत २ उपायुक्त, १ अतिरिक्त पोलिस आयुक्त,,४ सहा. पोलीस आयुक्त,पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक ५४ ,४५३ पुरुष व १४७ महिला कर्मचारी तैनात असल्याचे माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांनी दिली.