सुनील भंडारे पाटील
वाघोली (तालुका हवेली) विकासाच्या जडणंघडणीत आजवर मोलाचा वाटा शिवदास उबाळे,वसुंधरा उबाळे यांच्या कुटुंबाचाच मानला जातो.तसेच सामाजिक क्षेत्रात स्व:त खर्चातून नागरिकांची कामे करण्यात,नागरिकांना सेवा,सुविधा,योजनांचा लाभ मिळवून देण्यात उबाळे यांचे कुटुंबं वाघोलीत अग्रेसर आहे.त्यामुळे राजकीय,समाजिक क्षेत्राबरोबर सर्वच क्षेत्रात उत्तम काम, कार्य,कामगिरी करण्यामध्ये शिवदास उबाळे यांच्या कुटुंबाचे नाव समाजिक काम करणारे एक दानशूर कुटुंब म्हणून प्रामुख्याने नागरिकांकडून सर्वप्रथम घेतले जाते.अशी वाघोलीत उबाळे कुटुंबाची ओळख आहे.यामध्ये दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा वाघोलीचे माजी सरपंच शिवदास मनोहर उबाळे व हवेली तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती तथा वाघोलीच्या सरपंच वसुंधरा शिवदास उबाळे यांचे वाढदिवस हे इतरत्र खर्च अनावश्यक खर्च टाळून समाजिक उपक्रम राबवूनच साजरे केले जातात.
यामध्ये यावर्षी २३ जुन रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा वाघोलीचे माजी सरपंच शिवदास मनोहर उबाळे यांचा वाढदिवस हा समाजिक उपक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात येत आहे.यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोली परिसरातील ऐकून ५००० पाच हजार लोकांना स्व:त खर्चातून अष्टविनायक दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच १ ते १० गटातील एकूण ५००० पाच हजार मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा स्वत खर्चातूनच मोफत लाभ मिळवून दिला जाणार आहे.त्याचप्रमाणे शिवदास उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीकरांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी म्हणून प्रमुख आकर्षण गौतमी पाटील यांचा ऑर्केस्टा या संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हे सर्व नियोजन भैरवनाथ युवक मंडळ,उबाळेनगर वाघोली व शिवदास उबाळे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
मोफत अष्टविनायक दर्शन यात्रेला येण्यासाठी व सहभाग नोंदविण्यासाठी अष्टविनायक दर्शन यात्रेचा संपर्ण अर्ज भरून देऊन आपला ५००० हजार लोकांमध्ये लवकरात लवकर सहभाग नोंदवावा.यासाठी वसुंधरा उबाळे,शिवदास उबाळे,गौरव उबाळे,प्रदिप उबाळे,दिनेश उबाळे,सचिन उबाळे,तुषार उबाळे यांच्याशी संपर्क साधून आपला मोफत प्रवेश यात्रेचा अर्ज/फॉर्म भरून नोंदवणे.अशी माहिती युवा नेते गौरव उबाळे यांच्याकडून देण्यात आली आहे.