सुनील भंडारे पाटील
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये राज्यात तिसरी आलेली दर्शना पवार हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी राहुल हंडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली, मुंबई वरून पुण्याला येत असताना त्याला अटक करण्यात आल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्पष्ट केले आहे,
पुणे जिल्ह्यातील, वेल्हा तालुक्यामधील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवार दिनांक 18 रोजी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला होता, या बातमीने संपूर्ण पुणे जिल्ह्यात तसेच राज्यात या घटनेने खळबळ उडाली होती, दर्शनाचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते, दर्शना ही मूळची अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी आहे, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेतील निकालामध्ये वनपरीक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड झाली होती, तिने या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला होता, 9 जूनला पुण्यामध्ये सत्कार होता, त्यानंतर ती पुणे येथील नन्हे परिसरात एका मैत्रिणीकडे राहत असताना, 12 जून रोजी सिंहगड किल्ल्यावर निघाली आहे असे सांगून ती गेली त्यानंतर तिचा मोबाईल देखील बंद होता, ती बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमध्ये तिच्या कुटुंबियांनी दिली, दर्शना बरोबर असलेला तिचा मित्र राहुल हंडोरे बेपत्ता झाल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली, तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी वारजे पोलीस ठाण्यात दिली, दर्शनाचा मृतदेह सापडल्यानंतर राहुलच्या शोधात पोलीस होते, त्यानंतर त्याला मुंबई वरून पुण्याला येताना पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या,
दर्शना आणि राहुल यांची खूप जुनी ओळख होती, त्यामधून राहुल याने दर्शनाला लग्नाविषयी विचारले असता दर्शनाने सरळ सरळ त्याला नकार दिल्याने राहुल हंडोरे ने तिचा खून करून मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी टाकल्याची कबुली दिल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल मीडियाशी बोलताना सांगितले,