वाघोली (तालुका हवेली) येथे प्रदिपदादा वळसे पाटील ( व्हॉइस चेअरमन भीमाशंकर सह. साखर कारखाना )यांच्या वाढदिवसा निमित्त व एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व जागतिक रक्तदाता दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन वाघोलीचे मा. उपसरपंच शांताराम बापू कटके व मित्र परिवाराने केले होते.
शांताराम बापू कटके यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे शिबिर संपन्न झाले.तब्बल १२६ रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला.शिबिरात विद्यार्थी, महिलांसह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला.या वेळी शांताराम बापूनी प्रदीप दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले की "स्वैच्छिक रक्तदाता" म्हणून आपण जेवढे समाजातील लोकांना जागृत कराल तेवढी माहिती जनमानसात रुजेल. आजकाल सोशल मिडिया, डिजिटल मिडिया प्रिंट मिडिया आदी माध्यमातून समाजात जनजागृती करतांना पाहायला मिळते. आजकाल रक्ताची गरज कुणालाही असो, व्हाट्सअपच्या माध्यमातून सर्वांपर्यत मेसेज पोहचवला जातो. यात सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या रक्तदात्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज पावेतो आपल्या देशात अनेक प्रगतीच्या वाटा निर्माण झाल्या पण मानवी रक्तासाठी कोणताही पर्याय आजपर्यंत मिळाला नाही. रक्त हे कुठल्याही प्रयोगशाळेत तथा कारखान्यात तयार होत नसते, हे आजही सर्व सामान्य माणसाला माहीत आहे. पण ते तयार होते तुमच्या आमच्या मानवी शरीरात..! याबाबतीत समाजात रक्तदानाविषयी सामाजिक बांधिलकी आपल्या जनमानसात रुजणे आवश्यक आहे.हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी आव्हाळवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ आव्हाळे, अनंत युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्त्, रक्तदाते, यांनी विशेष प्रयत्न केले, त्यांचे सर्वांचे मनःपूर्वक आभारही या वेळी शांताराम बापूनी मानले.
यावेळी अनंत ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन सोमनाथ आव्हाळे,तसेच गणेश हरगुडे, सुधीर जायभाय,ज्येष्ठ मार्गदर्शक बबनराव जायभाय,
, गुलाब सातव,संपत जगताप,संदीप कटके, प्रकाश हरगुडे,चंद्रकांत गाडूते, माऊली घायतिडक,योगेश ढगे,अजित देवकर,
माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई कटके, गुलमोहर पार्क चेअरमन युवराज भाऊ दौंडकर,
अक्षय बेंडावले, मोहन हरगुडे,प्रतीक शिवरकर, गणेश जाधव, अविनाश जाधव, अविनाश कटके, आदिनाथ गाडे, आदी उपस्थित होते,