सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (तालुका हवेली) पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांची नुकतीच गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे बदली झाल्याने या जागेवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून विश्वजीत काईगडे यांनी पदभार स्वीकारला,
पुणे नगर महामार्गावर लोणीकंद आणि परिसरातील महत्त्वाच्या गावांमध्ये महत्वाचे समजले जाणारे पोलीस स्टेशन म्हणजे लोणीकंद पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुरक्षितेसाठी आणि शांततेसाठी प्रचलित असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांची कारकीर्द दांडगी आहे, त्यांना निरोप देताना लोकांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले, तसेच लोणीकंद पोलीस स्टेशन मधील कर्मचारी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले, सर्व पोलीस सहकाऱ्यांनी पवार यांच्यावर पुष्परुष्टी करत त्यांची गाडी ओढत त्यांना निरोप दिला,
समाजामध्ये अतिशय मोठी जबाबदारी असणारे पोलीस स्टेशन लोणीकंद पोलीस स्टेशन च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी आता नव्याने विश्वजीत काईगडे यांची नियुक्ती झाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या हस्ते विश्वजीत काईगडे यांनी पदाभार स्वीकारला,