संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण बेलवंडीत

Bharari News
0
ज्ञानेश्वर मिडगुले - बेलवंडी
       निळोबाराय दिंडी सोहळ्यात आज पहिले गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले . यामध्ये दिंडीचा अश्व प्रथम 'माऊली माऊलीचे जयघोषात गोलाकार रिगणात पळाला व त्यानंतर बेलवंडी गावचे २ अश्व दौडविण्यात आले .
         त्यानंतर पताकावाले, चोपदार भालदार , तुलसीधारक महिला, विणेकरी, मृदुंगवादक आणि पोलीसांनाही शर्यत रुपात पळविण्यात आले यातील विजेत्या पहिल्या तिन नंबरला दिंडी सोहळ्यातर्फे बक्षीसे देण्यात आली .बेलवंडी गावचे  सरपंच व ग्रामस्थांनी दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले व सर्वांनी मिळून या दिंडीसोहळा रोडच्या विस्तृत कामासाठी प्रयत्न करण्याचे सुतोवाच केलें दिंडी सोहळा कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी गोल रिंगण व इतर स्पर्धांचे सुत्रसंचालन केले . यावेळी स्थानीक महीला व भावीकांनी आनंद लुटला .पोलीस पथकाने चोख बंदोबस्त चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!