रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
शाळांमध्ये नाताळ सण साजरा करणाऱ्या माध्यमिक विद्यालयांवर व सबंधित मुख्यध्यापकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मनसे चे पदाधिकारी नानासाहेब लांडे यांनी गटशिक्षणाधिकारी शिरुर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार कान्हुर मेसाई येथील माध्यमिक विद्यालयात डिसेंबर २०२१ मध्ये नाताळ सण साजरा करण्यात आला. तर डिसेंबर २०२२ मध्ये शिरुर तालुक्यातीलच मौजे भाबांर्डे व निमगाव म्हाळुंगी येथील माध्यमिक विद्यालयात ही मुलांना ऊन्हात बसवून नाताळ सण साजरा करण्यात आला. सदर सण साजरा करताना संबंधित शाळांच्या मुख्यध्यापकांनी शासनाच्या कोणत्या कायद्या नुसार सण साजरा केला. व नाताळ सण साजरा करायची शासकीय परवानगी नसेल तर कोणाच्या परवानगीने हा सण साजरा करतात. तसेच नाताळ सण शाळेत साजरा करण्यासाठी संबंधित मँजिक बस या संस्थेने ही रितसर परवानगी घेतली आहे का ? या बाबत खुलासा करावा. व सबंधित मुख्यध्यापकांवर कायदेशीर कारवाई करावी. कारण नाताळ सणाची शासकीय सुट्टी असताना ही हा सण शाळेत साजरा होतोच कसा? आणि संमंधीत शाळेमध्ये हिंदू मुले शाळेत शिक्षण घेत असताना त्याठिकाणी पाश्चात्य धर्म संस्कृती लादण्याचा प्रकार नकळत घडवला जातो आहे. त्याबाबत चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी नानासाहेब लांडे यांनी केली आहे.
या बाबत गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांच्याशी संर्पक साधला असता या बाबत संबंधित विभागातील केंद्र प्रमुखांना सदर प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करावा असे सांगितले आहे. व या अहवालानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.