केंदुर (ता शिरूर) गावचे आदर्श पोलीस पाटील सुभाष आप्पा साकोरे यांच्या सेवापुर्ती सोहळा केंदूर या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे पाटील, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश बापू पवार माजी सभापती भाऊसाहेब साकोरे, माजी सभापती सदाशिव थिटे, भाजपा नेते भगवानराव शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सचिव आबासाहेब पऱ्हाड, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर प्रमोद पऱ्हाड ,भाजप नेते रवीदादा गायकवाड,चेअरमन राम साकोरे,प्राचार्य अनिल साकोरे,मा.सभापती शंकर जांभळकर,खेड तालुका अध्यक्ष अमोल पाचपुते,केंदूर नगरीचे सरपंच सूर्यकांत थिटे, उपसरपंच विठ्ठल ताथवडे, माजी सरपंच सुवर्णाताई थिटे, मंगल थिटे व ग्रामपंचायत कार्यकारिणी अनेक मान्यवर यांनी उपस्थित राहून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पाबळ औट पोस्टचे सहाय्यक फोजदार ढेकणे साहेब, चौधर साहेब, शिरूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी पोलीस पाटील व केंदूर व परिसरातील बहुसंख्य जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता,