सुनील भंडारे पाटील
तुळापूर (ता हवेली) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कृषी अधिकारी हवेली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाले, यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. रसाळ शास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादन, खोडवा व्यवस्थापन व हुमणी नियंत्रण याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे हुमणी अळी व गोगलगाय नियंत्रणाची अतिशय महत्त्वाची माहिती दिली. तसेच ढवळे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची माहिती देऊन तरुण शेतकऱ्यांनी शेतीपूरक प्रक्रिया उद्योगात उतरावे याबाबत मार्गदर्शन कृषी सहाय्यक अर्चना मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कृषी विभागाच्या योजना विषयी शेतकऱ्यांशी चर्चा केली, रेश्मा शिंदे BTM, पर्यावरणपूरक जीवनपद्धती याबाबत माहिती दिली. यावेळी खंडू शिवले यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत चर्चा अर्चना मोरे,.रूपाली भोसले कृषी सहाय्यक यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.उपसरपंच राजाराम शिवले, कृषीमित्र. सुनील शिवले व इतर शेतकरी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.