सुनील भंडारे पाटील
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील उद्यान विभागाचे सहाय्यक उद्यान निरीक्षक व उपलेखापाल यांचेवर लाच मागणी व लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी रंगेहात पकडले, या दोघांवर कारवाई करण्यात आली,
भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड गुन्हा रजिस्टर नंबर 244/2023, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 7,7अ,12 नुसार लोकसेवक 1) किरण अर्जुन मांजरे वय 46 वर्ष, सहाय्यक उद्यान निरीक्षक, उद्यान विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे, 2) संजय देवराम काळभोर वय 56 वर्ष, उपलेखापाल, उद्यान विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे, या दोघांना लाच मागणी व प्रत्यक्ष घेतले प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे,
उद्यान विभाग कार्यालय, गुलाब पुष्प उद्यान, नेहरूनगर भोसरी, पिंपरी चिंचवड या ठिकाणी ही कारवाई झाली असून यातील तक्रारदार हे ठेकेदार आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यानासाठी केलेल्या देखभालीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी मांजरे याने तक्रारदाराकडे 17,000 रुपये लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती, सदर तक्रारीची पडताळणी केली असता मांजरे यानी तक्रारदार यांच्याकडे 17,000 रुपये लाचेची मागणी केली, तसेच काळभोर यानी लाच मागणीस सहाय्य केले तसेच ही लाच स्वीकारताना दोघांनाही लाचलुजपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांनी रंगेहात पकडले दोघांनाही अटक करण्यात आली असून विशेष न्यायालय पुणे येथे हजर करण्यात आले, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत,
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने केली,