सुनील भंडारे पाटील
असंख्य लोकसंख्या असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वाघोली (तालुका हवेली) येथे कचरा प्रश्न गंभीर झाला असून, फुटपाथ वर कचरा साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, या प्रश्नाकडे पुणे महानगरपालिका मात्र दुर्लक्ष करत आहे,
दाट शहरीकरण, वाढती लोकसंख्या मोठी उलाढाल यामुळे वाघोली गाव सतत चर्चेत आहे, गेल्या दोन वर्षांपूर्वी वाघोली हे गाव पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले असून, याचा मोठा फायदा पुणे महानगरपालिकेला होणार आहे, परंतु महानगरपालिकेकडून मात्र लोकांच्या काही मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे, पुणे नगर महामार्गालगत केसनंद फाटा येथे मोठे कचऱ्याचे ढीग साचले असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, परिणामतः रोगराई पसरण्याची शक्यता आहे, या कचऱ्याच्या ढिगापासून काही अंतरावर खाऊ गल्ली असून वडापाव, पाणीपुरी, समोसा, भेळ, मिसळ, खाण्यासाठी लोकांची सतत गर्दी असते, तसेच या भागात हॉटेल व स्वीट होम देखील आहेत, त्यामुळे संबंधित कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे, तसेच फुटपाथ वरून प्रवास करताना लोकांना याचा त्रास होत आहे, महानगरपालिकेने तातडीने कचऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक वारंवार करत आहेत,