वाघोलीत ५००० मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात....
-[शिवदास उबाळे यांच्या कुटुंबाचा मोफत उपक्रम]-
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा वाघोलीचे माजी सरपंच शिवदास मनोहर उबाळे यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून यावर्षीचा वाढदिवस सामाजिक लोकउपयोगी उपक्रम राबवून जल्लोषात साजरा करण्यात आला.यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अड.अशोक पवार यांनी शिवदास उबाळे यांचा सत्कार करून त्यांचे कामांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
शिवदास उबाळे यांच्या कुटुंबाच्या वतीने मोफत ५००० मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ दिला जाणार आहे.तर ५००० लोकांना मोफत अष्टविनायक यात्रा घडवली जात आहे.यामध्ये ५००० मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवून देण्यास सुरुवात झाली असून त्याचा प्रारंभ उबाळे कुटुंबाकडून करण्यात आला आहे.अशी माहिती पंचायत समितीच्या माजी सभापती तथा वाघोलीच्या सरपंच
वसुंधरा उबाळे,गौरव उबाळे,प्रदिप उबाळे,दिनेश उबाळे,सचिन उबाळे,तुषार उबाळे यांनी दिली.
[ वाघोलीच्या विकासात आमच्या कुटुंबाचा मोलाचा वाटा असून आजवर अनेक लोकउपयोगी सामाजिक उपक्रम मोफत राबविण्यात आले आहे.यामध्ये यावर्षी माझ्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाकून ५००० लोकांना अष्टविनायक मोफत यात्रेचे आयोजन केले तर ५००० मुलींना मोफत सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवून दिला जात आहे.या मोफत उपक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा.
-शिवदास उबाळे,जिल्हाध्यक्ष- राष्ट्रवादी ओबीसी सेल तथा मा.सरपंच-वाघोली