लोणी काळभोर अनिकेत मुळीक
लोणी काळभोर (तालुका हवेली) मध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला किन्नर बनवण्याचा प्रयत्न..नैसर्गिक किन्नर हा जन्मजात असतो.पण काही बोगस किन्नर बनून ,खोट्या अंधश्रद्धा पसरवून समाजाची आर्थिक लूट करत आहे..अशीच एक बोगस टोळी मत परिवर्तन करून अल्पवयीन मुलांना बळजबरीने किन्नर बनवत आहे.
लोणी काळभोर हद्दीतील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला मत परिवर्तन करून बळजबरी किन्नर बनविण्याचा प्रयत्न केला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.कदमवाकवस्ती येथील एका किन्नर टोळी वर अल्पवयीन मुलाच्या पित्याने आरोप केला आहे.आपल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवुन नेऊन, त्याला मत परिवर्तन करण्याचा माध्यमातुन बळजबरीने किन्नर बनवले जात असल्याची गंभीर तक्रार एका अठ्ठेचाळीस वर्षीय पालकाने लोणी काळभोर पोलिस स्टेशन मध्ये दिली आहे. धक्कादायक घटना अशी की अल्पवयीन मुलाला बळजबरीने किन्नर बनवु पहाणाऱ्या टोळीतील बरेचशे बोगस बनावट किन्नर असल्याचा आरोपही संबधित पालकाने केला आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मागील कांही वर्षापासुन मुलाचे वडील आपली पत्नी व त्यांची दोन मुले, 2 मुलांसहित असे चार जण राहत आहेत. धाकटा मुलगा हडपसर येथे शिक्षण घेत असून. दुसरा मुलगा दहावीला आहे. धाकटा मुलगा २५ मे ५ जुन या बारा दिवसाच्या काळात घरातून गायब झाला होता. या दहा दिवसाच्या काळात त्यांचा असे लक्षात आले की आपल्या धाकट्या मुलाचे मत परिवर्तन करून बळजबरीने किन्नर बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
आमचे कुटुंब हे वारकरी पंथातील असुन, तो नित्यनेमाने लोणी काळभोर परीसरात भजन-किर्तणासाठी जात होता. मात्र २५ मेला घरातुन गेला तो परत आलाच नाही. त्याचे वडील व नातेवाईक त्याचा तपास करत आहे असे समजताच,बनावट किन्नर टोळीने त्याला 5 जून रोजी घरी सोडले परंतु काही तासातच तो पुन्हा गायब झाला,या वेळी मात्र कुटुंबाने पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली.
सध्या मिसिंग असलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाचा तपास चालू असुन, संबधित मुलाचा शोध पोलिस यंत्रणा घेत असल्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी सांगितले..