सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक योगदिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला, यावेळी शाळेमधील एकूण ६०० विद्यार्थ्यांनी योगासने केली,
कोरेगाव भीमा परिसरामध्ये गेल्या नऊ वर्षापासून ज्ञानांकुर शिक्षण प्रसारक मंडळ सनराइज् इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी ज्ञानदानाचे अतिशय चांगले काम करत असून, शाळेमार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात, जागतिक योग दिनानिमित्त सुष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने याविषयीची माहिती, तसेच योग दिनाची माहिती व महत्त्व, तसेच त्याचा आपल्या शरीरावर व मनावर होणारा परिणाम याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली, शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी हा योग दिन साजरा करण्यात येतो असे शाळेचे मुख्याध्यापिका प्रतीक्षा लांडे / घुटे यांनी सांगितले, यावेळी शिक्षिका भारती शिंदे, अनिता झावरे, शिल्पा मिस्त्री, निर्मला मुरकुटे, शितल ताठे, गीता ढगे, अश्विनी उन्हाळे, रोहिणी शिंदे, वंदना कुमारी, सुजाता गवळी, मनीषा वाघमारे, संगीता पारखे, सुप्रिया चौधरी, सुवर्णा देशपांडे, तनुश्री नायक, तसेच शिक्षक मिलिंद गायकवाड, सागर वाणी, शैलेश वगैरे यांनी मुलांना योगासनाचे धडे शिकवले,
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भगवानराव भंडारे, उपाध्यक्षा मोहिनी फडतरे, सचिव ज्योती फडतरे, माजी चेअरमन संजय फडतरे, माऊली आप्पा भंडारे, सचिन भंडारे, मोनिका भंडारे, शारदा भंडारे, शहाजी फडतरे, आनंदा फडतरे यांनी योग दिनाच्याशुभेच्छा दिल्या,