रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
गणेगाव खालसा (ता. शिरुर) येथील वनविभागाच्या हद्दीत अज्ञात इसमांनी टाकलेले भंगार कुणीतरी अज्ञातांनी पेटवून दिल्यामुळे वन विभागाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
गेले अनेक दिवसांपासुन रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील भंगार वन विभागाच्या जागेत टाकण्याचा उद्योग काही भंगार व्यावसायिकांकडून सुरु होता. या बाबत प्रसार माध्यमांमध्ये वृत्त ही प्रसिद्ध करण्यात आले होते. व वन विभागाने काही भंगाराचा उचलून बाजुला केले होते. माञ भंगार टाकण्याच्या उद्योगात वन विभागाचे काही झारीतील शुक्राचार्य सहभागी असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा कचरा टाकला गेला व आज पहाटेच्या सुमारास या कच-याला काही अज्ञात इसमांनी आग लावली या आगीत वन विभागाच्या जागेतील झाडे ही जळून खाक झाली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.