सुनील भंडारे पाटील
भावडी (तालुका हवेली) येथील हांडगर वस्ती जवळ इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये चालू असलेल्या हातभट्टी दारू भट्टीवर लोणीकंद पोलिसांनी मोठ्या प्रभावीपणे छापा टाकत हातभट्टी दारू तयार करणारी भट्टी उध्वस्त करण्यात आली,
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारूचे अवैध धंदे चालू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या, हातभट्टी दारू जनसामान्यांच्या आरोग्य धोक्यात घालत असून त्यामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झाले आहेत, सदर प्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग पुणे रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सदर हातभट्टीवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, यांनी पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली स पो नी गोडसे व त्यांच्या तपास पथकाची एक टीम तयार करत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वाहने लांब सोडून सुमारे 2 किलोमीटर चालत जाऊन भावडी गावच्या हद्दीत हांडगर वस्ती जवळ इंद्रायणी नदीच्या पात्रात चालू असलेल्या हातभट्टी दारू भट्टीवर छापा टाकला,
या छाप्यामध्ये 70 लिटर दारू जप्त करण्यात आली, तसेच 1500 लिटर रसायन, लोखंडी बॅरल, ॲल्युमिनियम चा पाईप असा एकूण 86 हजार रुपये किमतीचा मुद्दे मला ताब्यात घेऊन नष्ट केला, तसेच संबंधितांवर दारूबंदी अधिनियम कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, सदर गुन्ह्यात हातभट्टी चालक तसेच लागणारे मालाचा पुरवठा करणारा इसम यांना अटक करण्यात आली आहे, सदरची कारवाई वर नमूद केलेल्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस नाईक सागर जगताप, पोलीस शिपाई पांडुरंग माने, आशिष लोहार, मल्हारी सपुरे, लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली आहे,