पंढरपूरात संताजी महाराज जगनाडे सांस्कृतिक भवन उत्तम होणार:शिवदास उबाळे,
श्री संताजी महाराज जगनाडे भवनाचा भूमिपूजन शुभारंभ उत्साहात,
मागील काही बऱ्याच वर्षांपासून पंढरपूरात समाजाचे विविध धार्मिक ,सांस्कृतिक,आदी कार्यक्रम किंवा विसावा,मुक्काम आदी व्यवस्था करण्यासाठी सांस्कृतिक भवनाची कमतरता समाजाला कायमच भासत होती.ती कमतरता आता पूर्ण होणार असून पंढरपूर येथे संताजी महाराज जगनाडे सांस्कृतिक भवन बांधण्यात येत आहे.या सांस्कृतिक भवनाचे उत्तम दर्जाचे काम सर्वांच्या मदत व सहकार्यातून होणार आहे.या सांस्कृतिक भवनाचा भूमिपूजन शुभारंभ आषाढी एकादशी निमित्त अवचित्य साधून उत्सहात करण्यात आल्याचे माहिती देताना श्री संताजी महाराज जगनाडे यांचे सुदुंबरे संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे यांनी सांगितले.
पंढरपूर येथे श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने यावर्षी आषाढी एकादशी शुभ दिनानिमित्त श्री संताजी महाराज जगनाडे या सांस्कृतिक भवनाचा भूमिपूजन शुभारंभ ह.भ.प. परमपुज्य शांती ब्रम्ह वैराग्यमूर्ती मारुतीबाबा कुऱ्हेकर,भगवताचार्य परमपूज्य श्री.रामकृष्ण महाराज शास्त्री(आळंदी) यांच्या शुभ हस्ते पार पडले.हे श्री संताजी महाराज जगनाडे सांस्कृतिक भवन पंढरपूर येथे कैकाडी मठाजवळ,रेल्वे लाईनजवळ,प्रजापिता ब्रह्मकुमारी शेजारी उभारण्यात येत आहे.याचे आयोजन व नियोजन श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळाचे अध्यक्ष नारायण क्षीरसागर, श्री संताजी महाराज जगनाडे यांचे सुदुंबरे संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे,पालखी सोहळ्याचे सचिव अरविंद रत्नपारखी,सुदुंबरे संस्थेचे उपाध्यक्ष गंगाधर हाडके,पालखी सोहळ्याचे खजिनदार मनोहर जाधव,पालखी सोहळ्याचे सदस्य ताराचंद देवराय,सदस्य शंकर काळे,सदस्य हभप कोंडीबा दिवेकर,सदस्य लक्ष्मण शेलार,सदस्य विश्वास डोंगरे,तसेच सुदुंबरे संस्थेचे सदस्य अरुण काळे,सदस्य वनारसीबाई राऊत,सदस्य हभप बाळासाहेब वाळुंजकर,सदस्य उल्हास वालझाडे,सदस्य प्रदिप वाव्हाळ,सदस्य जयश्री राऊत,सर्व दिंडी प्रमुख ह.भ.प श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.