सुनिल भंडारे पाटील
तुळापूर (ता हवेली) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजनेबद्दल मंडळ कृषी अधिकारी चौधरी.ढवळे, कृषी पर्यवेक्षक तसेच.अर्चना मोरे कृषी सहाय्यक यांनी फुलगाव तुळापूर वढू खुर्द येथील शेतकरी बांधवांना एक रुपयात विमा काढण्याबद्दल आवाहन केले.
हवेली तालुक्यासाठी भात, ज्वारी ,बाजरी,भुईमूग या पिकांसाठी पिक विमा काढता येईल यासाठी आवश्यक कागदपत्र पिकाची नोंद असलेला सातबारा,आधार कार्ड,बँक पासबुक व स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत तसेच अर्ज 1 जुलै ते 31 जुलै आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रामध्ये अथवा जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये करता येईल तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.