सुनील भंडारे पाटील
पुण्यातील रामचंद्र एज्युकेशन सोसायटीच्या श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात गरुड झेप घेतलेली आहे. या महाविद्यालयामध्ये नुकत्याच झालेल्या नामांकित कंपनीच्या मुलाखतीच्या फेरीमध्ये संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांची ASP Ol media pvt ltd या आयटी कंपनीमध्ये उच्च पदावर निवड झालेली आहे,
त्यांच्या यशात श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मारुती बापू भूमकर, प्राचार्य डॉ. अविनाश देसाई, संगणक विभाग प्रमुख प्राध्यापक शिंदे बाबासो कॉम्प्युटर विभागाच्या प्लेसमेंट प्रमुख, प्राध्यापक कोमल यादव, आणि इतर सर्व शिक्षकांचा व सहकारी यांचा मोलाचा वाटा होता. सदर मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल सर्व संबंधित विद्यार्थ्यांचे कौतुक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन सर्वच स्तरातून होत आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती रामचंद्र भुमकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शिक्षकांना या पुढील काळात असेच मुलाखतीचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याचे आवाहन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्यांनी बदलत्या काळातील व आधुनिकतेतील नोकरीच्या संधी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कॉम्प्युटर विभागाचे विभाग प्रमुख यांनी सदर यशामध्ये विद्यार्थीच्या कर्तृत्वाचा अभिमान असल्याचे मत व्यक्त केले. तर प्लेसमेंट प्रमुख प्राध्यापक कोमल यादव यांनी हा प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वी होण्यामागे संस्थेच्या सर्व स्तरातील सहकाऱ्यांची मदत झाल्याचे मत व्यक्त केले. श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाते. आणि त्यांची निवड केली जाते.या वर्षी अनेक विद्यार्थ्यांना सर्वोच्च पॅकेज मिळाले आहे. त्यांच्या यशामागे त्यांच्या कॉलेजसह त्यांच्या पालकांचाही हात आहे. या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनाही कॉलेजतर्फे वेळोवेळी वेबिनार आयोजित करून मार्गदर्शन केले जाते.