खेड प्रतिनिधी
कडूस (ता खेड) महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा या शाळेचा अर्णव नवनाथ वाघोले (२५८ गुण) या विद्यार्थ्याने पाचवी शिष्यवृत्तीधारक जिल्हा गुणवत्ता यादीत ११४ वे स्थान पटकावले असून गेल्या २२ वर्षापासूनची शाळेची शिष्यवृत्ती यशाची अखंडीत परंपरा कायम राखली असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास शिंदे यांनी दिली.
अर्णवची सैनिक स्कूल साठीही निवड झालेली असून त्याला वर्गशिक्षिका व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदा ढमाले यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे रानमळा शाळेतील संपत गायकर , बाबाजी शिंदे , कविता बनकर , सलिम शेख , प्रिया देवरे , रजिता गुंजाळ यांचेही मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे , विस्तार अधिकारी नंदा पवार , केंद्रप्रमुख भिमराव पाटील , शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सारीका शिंदे , ग्रामविकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष यादवराव शिंदे , सरपंच प्रमोद शिंदे , उपसरपंच रोहिणी दौंडकर , जि.रं. शिंदे , बाजीराव शिंदे , शंकर शिंदे , मिलिंद शिंदे , अजय दौंडकर , अरविंद दौंडकर , दशरथ भुजबळ , उल्हास भुजबळ , होनाजी शिंदे , नवनाथ वाघोले , गणेश भुजबळ , नवनाथ थोरात , प्रविण सुकाळे , प्रकाश शिंदे , दत्तात्रय शिंदे , सायली भुजबळ , अक्षदा सुकाळे , स्वप्ना वाघोले , होनाजी गावडे , कविता गावडे , राजेश दौंडकर , महेंद्र दौंडकर , शैलेश बनकर , माधुरी शिंदे , मोनिका सुकाळे यांनी अभिनंदन केले.