लोणी काळभोर अनिकेत मुळीक
लोणी काळभोर/ कदमवाक वस्ती, (तालुका हवेली) : दादर जंक्शन रेल्वे स्टेशनवरती बॉम्ब आहे अशी खोटी माहीती देणाऱ्या तरुणाला पडले महागात, लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवने रेल्वे स्टेशन परिसरात अशांतता निर्माण करून अफवा पसरविणाऱ्या तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीमधील हॉटेल जय श्री परिसरातील रविवार (दि १६) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
योगेश शिवाजी ढेरे (रा. गोखलेनगर, विठ्ठल रुक्मीनी - मंदीर जवळ जनवाडी, पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या ईसमाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रशांत प्रकाश सुतार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विष्णू देशमुख लोणी काळभोर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी प्रशांत सुतार व त्यांचे सहकारी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रशांत सुतार व योगेश पाटील हे गस्त घालीत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथील हॉटेल जय श्री या ठिकाणी कॉलर थांबले आहेत. अशी माहिती मिळाली त्यानुसार कॉलर सांगत आहे की, दादर जंक रेल्वे स्टेशन वरती बॉम्ब आहे. तसेच कॉलर हा लोणी काळभोर हद्दीतील कवडीपाट येथे असल्याचे लोकेशन दाखवत आहे. अशी माहिती मिळताच सदर ठिकाणी असलेल्या कॉलर यांचे मोबाईलवर संपर्क साधला असता फोन स्विच ऑफ असल्याचे आढळून आले.
हॉटेल जय श्री येथील कामगारांकडे मोबाईल नंबर बाबत चौकशी केली असता. कॉलर मोबाईल योगेश ढेरे याचा असल्याचे समजले. यावेळी योगेश ढेरे याचा शोध घेतला असता तो हॉटेलचे बाहेरच सापडून आला. त्याच्याकडे सदर कॉलचे संधर्भात चौकशी केली असता त्याने कोणता कॉल,कोण तुम्ही,अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाक्या दाखवताच व अंगझडती घेतली असता त्याचेकडे मोबाईल मिळून आला. कसून
चौकशी केली अस लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवून पळापळ व्हावी, या उद्देशाने पोलीसांना खोटी माहीती दिल्याचे निष्पन्न झाले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी अशा विकृत बुध्दीचा आरोपिला पकडुन समाजा मध्ये कौतुकाचे स्थान निर्माण केले आहे.