वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे कृषि विभागामार्फत 1 रु पिक विमा काढण्याचे आवाहन कृषि अधिकारी प्रशांत दोरगे यांनी केले आहे शिरूर तालुक्यासाठी मूग,उडीद,बाजरी ,भुईमूग,तूर ही पिके अधिसूचित आहेत विमा काढणेसाठी ईपीक मध्ये संबंधित पीक नोंद करणे गरजेचे आहे,
पीक विमा ही गरजेची व आवश्यक गोष्ट आहे बाबत मोठ्या प्रमाणावर नोटीस बोर्ड ,चर्चासत्रे भेटीअंती,,माहिती पत्रके समाज माध्यमे द्वारे व्यापक प्रचार प्रसिद्धी करण्यात आली आहे चालू वर्षी पाऊसाची अवकृपा पाहता सदर योजनेस अनन्य साधारण महत्व आले आहे वढू बु, ,आपटी,वाजेवाडी,मांजरेवाडी, कॊरेगाव भिमा,डिंगराजवडी,धानोरे वाडा पुनर्वसन ,व परिसरातील गावातील सर्व शेतकरी बांधवांना एक रु पीक विमा काढण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे, यावेळी माजी सरपंच अंकुश शिवले, ग्रामपंचायत सदस्य माऊली आप्पा भंडारे, विकासो व्हा चेअरमन काळूराम गोसावी व ग्रामस्थ उपस्थित होते,