सुनील भंडारे पाटील
निमोणे (तालुका शिरूर) येथील शेतकरी महिलेने शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने रस्त्याची मागणी केली असता शासकीय अधिकाऱ्यांकडून उडवा उडवी ची उत्तरे मिळाल्याने शेतमाल बाहेर काढण्यासाठी एका शेतकरी महिलेने चक्क हेलिकॉप्टर खरेदी करणे कामी अनुदान व शासकीय मदत मिळण्यासाठी अर्ज केला आहे,
निमोणे येथील शेतकरी कुटुंबातील महिला लताबाई भास्कर हिंगे असे या महिलेचे नाव असून त्यांनी आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने रस्ता मिळण्यासाठी तहसीलदार शिरूर यांच्याकडे रस्ता मागणी अर्ज दाखल केला होता, सदर अर्जावर मंडल अधिकारी यांना स्थळ पाहणी करण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडल अधिकारी यांनी " लवकर पाहणी करू, सध्या वेळ नाही, मी नवीन बदली होऊन आलेलो आहे, " अशी उत्तरे दिली, आज रोजी हिंगे यांच्या शेतातील पीक काढणीला आलेले असताना, सदरच्या शेतामधील पिकवलेला शेतमाल बाहेर काढण्यासाठी मला हेलिकॉप्टर खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे, तरी तहसीलदार शिरूर यांनी हेलिकॉप्टर खरेदी करणे साठी अनुदान तसेच शासकीय मदत मिळावी अशी मागणी लेखी पत्र द्वारे शिरूर निमोणे मधील शेतकरी महिला लताबाई हिंगे यांनी तहसीलदार शिरूर यांना केली आहे,