सुनील भंडारे पाटील
राज्य शासनाचा एक रुपयांमध्ये पिक विमा ही योजना 31 तारखेला संपणार असून, पिक विम्याच्या ऑनलाइन नोंदीमध्ये गेल्या आठवड्यापासून अडथळा येत असल्याने, नोंदी मध्ये अडथळा येत आहे, त्यामुळे शासनाच्या या योजनेपासून शेतकरी मात्र वंचित राहणार आहे,
आज व उद्या शासकीय सुट्टी अंतिम तारीख 31 जुलै महिना अखेर, त्यामुळे तातडीने ऑनलाइन नोंदी होणे मुश्किल असल्याने तसेच संबंधित वेबसाईटला वारंवार अडथळा येत असल्याने शासनाच्या या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होईल की नाही अशी शंका उपस्थित होत आहे, राज्यामध्ये ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची जोरदार धावपळ चालू आहे, परंतु वेळेत नोंद न झाल्यामुळे असंख्य शेतकरी पिक विमा योजने पासून वंचित राहणार आहेत, त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात नैसर्गिक आपत्ती तसेच इतर कारणांमुळे भरमसाठ उत्पादन खर्च करून पिकवलेली शेती पिके जर काही कारणास्तव उध्वस्त झाली तर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून, शासनाने यावर निर्णय घेणे गरजेचे आहे, 1 रुपया मध्ये पिक विमा या योजनेच्या नोंदी चा कालावधी वाढवून द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे,