सुनिल भंडारे पाटील
खरेतर नवपिढी फारच हुशार आहे .जे चांगलं ते त्यांच्यापर्यंत एक तर पोहोचत नाही ' पोहोचलं तरी ते डोक्यात घेत नाहीत . आणि अध्यात्म परमार्थ संस्कार थोरामोठ्यांचा गुरुजनाचा आदर करणे यां गोष्टींची विद्यार्थी युवक मुलांच्यात वाणवा जाणवू लागलीय .
७०० वर्षापुर्वीचे संताचे अभंग पदे दोहे श्लोक ओव्या गौळणी भारूडांच्या चाली व भावार्थ सिनेमा ,आर्केस्ट्रा वा डीजेच्या गाण्यांपेक्षा खूप चांगल्या असतात पण त्या मुलांपर्यंत पोचत नाहीत ,ज्या गावोगावी भजन किर्तन प्रवचन काकडा हरिपाठात दररोज गायल्या जातात व आजही ताज्यातवाण्या वाटतात . आणी ही डीजेची गाणी वर्षभरच टिकतात पुढील वर्षी ती दिसत नाहीत . एखादाच वर्षात वाजणारी शांताबाई दुसऱ्या वर्षी बाबुराव आल्यावर गायब होते पण ती नवपिढीला भावते . पण जे बहिनाबाई मिराबाई मुक्ताबाई जनाबाई यांच्या सुंदर गोड रचना ज्या बालवाडी पासून कॉलेज पर्यंत अभ्यासक्रमात असतात त्या काही फक्त प्रश्न तरे लिहून पास होण्यासाठी नसतात आचरण्या साठी असतात . नामदेव एकनाथ ज्ञानदेव तुकाराम सेना गोरा सावता निळोबारायांचे अभंग जिवनास बळ देतात ते मुले डोक्यात घेण्यासाठी आणि गरीबाचा कमी हुशार मुलगाही जिवणात मोठा चांगला यशस्वी माणूस बनू शकतो हा विश्वास देण्याचे काम गेल्या १० वर्षात ८०० पर्यंत लहानमोठ्या शाळांनी स्वखर्चाने जावून केला आहे. व शाळांचे लायब्ररीस गिता, पुस्तके आणि २अभंग पाठ करू म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांस १५ हजारावर हरीपाठांचे वाटप केले आहे .
नांदेड, शेवगाव, सोलापुर, नगर, खोपोली, सांगोला, माढा, मंगळवेढा, बार्शी, बिड,पुणे विभागातील शाळांमध्ये जावून मोफत पाऊण एक तास प्रबोधन करण्याची ऊर्जा ६८ व्या वर्षीही अव्याहत आहे ही त्या पांडुरंगाचीच कृपा म्हणावी लागेल . सदर फोटोतील यशवंत विद्यालय भोसेतील व्याख्यान युट्युब चॅनेलवर गतवर्षी सहा हजारावर लोकानी पाहिले व आता सुदर्शनस् प्रबोधन न्युजचॅनेलवर दिसेल . शाळा कॉलेजांनी व्याखानासाठी ७७७४ 0१८ ६५५ व५८ वर संपर्क साधावा मुलांसाठी हरीपाठांसह हजर असेन असेही पत्रकार मिडगुले यांनी नमूद केले . त्यांचे दृष्टीने भारतातील १४० कोटी लोकसंख्येपैकी बालवाडी पासून कॉलेज पर्यंतच्या निष्पाप निर्भेळ सात्वीक निरपेक्ष अशा या विद्यार्थ्यीची सरकारी आकडेवारी बरोबर ३३ कोटीय , आणि हे ३३ कोटींचे देवपण जागविण्यासाठी, जगविण्यासाठी पणतीच्या ताकतीने प्रकाशाचं अस्तीत्व दाखविण्याचा खटाटोप आहे असे दिसते.