लोणी काळभोर अनिकेत मुळीक
लोणी काळभोर हद्दीतील उरुळी कांचन(तालुका हवेली) येथील घटना,घरातमध्ये कोणी नसल्याची संधी साधत अट्टल चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा किंमती मुद्देमाल चोरून नेणाऱ्या एका अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी सुपरफास्ट कामगिरी करत अवघ्या २४ तासाच्या आत ठोकल्या बेड्या.
राजकुमार ओकांर आप्पा आपचे ,वय २८, धंदा मजुरी, मुळ रा. कोथळी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद, सध्या हडपसर भागातील,होम मेट सोसायटी आपुलकी बार समोर, महादेवनगर, राहत होता. असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ४ लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार:-
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्वरगंधा सोसायटीत सोमवारी (ता. २६ रोजी राहत्या घरातील कडी कोयंडा तोडुन,सोन्याचे दागीणे व रोख रक्कम असा किंमती मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करुन चोरी करुन नेल्याची तक्रार डॉ. किरण सुहास शिंदे (वय ३७, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांना दिली होती.
या घटनेचा तपास करत असताना, लोणी काळभोर पोलीस,उरुळी कांचन ते हडपसर संपूर्ण भागातील जवळपास 250 सी.सी टी व्ही फुटेज चेक करुन, आरोपीचा शोध घेत होते. यावेळी तपास पथकातील पोलीस हवालदार नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, शैलेश कुदळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, उरुळी कांचन येथील घरातुन चोरी करणारा इसम हा कवडीपाट टोलनाका परिसरात थांबला आहे.निळा शर्ट, काळी पँट, वर्णन आहे,त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो तेथून पळ काढू लागतं त्याला अटक केले.पुढील तपास चालू आहे.
सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. रितेशकुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. संदीप कर्णिक, पोलीस सहआयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त साो, परिमंडळ-५, मा. अश्विनी राख, सहा. पोलीस आयुक्त सो, हडपसर विभाग, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवलदार सातपुते,नितीन गायकवाड, सायकर, बोरावके, जाधव, नागलोत, शिरगीरे, कुदळे, वीर, सोनवणे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.