पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी दीपक मानकर

Bharari News
0
लोणी काळभोर अनिकेत मुळीक
       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी चार दिवसापूर्वी शिंदे फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकारला पाठिंबा दर्शवित. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या घटनेनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे.शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या समर्थकाना आपण कोणत्या नेत्यासोबत जायचे हा प्रश्न पडला आहे. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी माजी उपमहापौर दीपक मानकर यांची नियुक्ती केली.     
  शहराध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर दिपक मानकर म्हणाले की, माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर अजित पवार यांनी शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मी आनंदी असून यापुढील काळात शहरातील सर्व समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार आहे.तसेच, संघटनेत प्रत्येक घटकातील व्यक्तीला पदावर काम करण्याची संधी दिली जाणार आहे. त्याच बरोबर राज्य सरकार मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना सर्व सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!