प्रागतिक पक्ष सत्ता परिवर्तन अभ्यास शिबीर.

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
          प्रागतिक पक्ष राज्यस्तरीय सत्ता परिवर्तन अभ्यास शिबिर दिनांक 9 व 10 जुलै 2023 रोजी अल्पबचत  भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये राज्यातील 13 घटक पक्ष  सहभागी होणार असल्याची माहिती जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व कार्यक्रमाचे स्वागतअध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.    
या शिबिरामध्ये  शेतकरी कामगार पक्षाचे  मा.आ,भाई जयंत पाटील  , समाजवादी पक्षाचे .आ.अबू असीम आझमी  , जनता दल (सेक्युलर) राष्ट्रीय उपाध्यक्ष .आ. प्रा.श्रीपतराव शिंदे,.आ.प्रा. शरद पाटील सर , भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. भालचंद्र कांगो , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे  कॉ. अशोक ढवळे , स्वाभिमानी पक्ष व शेतकरी संघटना मा.खा.राजू शेट्टी  , बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी एड. सुरेश माने , लाल निशाण पक्षाचे कॉ. व्ही. के. कुलकर्णी , CPI माले लिबरेशन कॉ. अजित पाटील , सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले , रिपाई सेक्युलर  शाम गायकवाड , बहुजन विकास आघाडी आ. हितेंद्र ठाकूर, श्रमिक मुक्ती दल भारत पाटणकर,  इत्यादी उपस्थित असणार आहेत.या शिबिरात  युवा, महिला, दलित, शेतकरी ,कामगार, वंचित, बहुजन, तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात होणारे बदल याविषयी मार्गदर्शन व चर्चा होणार आहे. व आगामी काळात महाराष्ट्राच्या जनते समोर सक्षम पर्याय म्हणून प्रागतिक पक्ष उभा राहणार असल्याची माहिती जनता दलाचे प्रदेशाद्याक्ष व प्रागतिक पक्षाच्या  अभ्यास परिवर्तन शिबिराचे  स्वागत अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!