ज्ञानेश्वर मिडगुले - कान्हूर मेसाई
कान्हूर मेसाई (तालुका शिरूर) येथील पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या अमित तळोले, विक्रांत तळोले ,ऋषिकेश लांघे ,
अक्षय थोपटे आदींचा कान्हूर मेसाई ग्रामस्थ व आप्तेष्टांतर्फे भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला .बस स्थानकापासून पेठेमध्ये सर्वत्र गुलाल भंडारा उधळून डीजेच्य तालावर नाचत तरुणाई मेसाई मंदिर प्रांगणात पोहोचली माजी उपसरपंच दिपक तळोले यांनी या साऱ्या युवकांनी कठीण परीस्थीतीवर मात करून परीश्रम घेऊन यश संपादन केल्याचे सांगत सुत्रसंचलनातच प्रास्ता वीक केले . माजी सभापती प्रकाश पवारांनी आगाऊ शुभेच्छा दिल्या . यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटनिस बबनदादा शिंदे , शिवसेनेचे संकटमोचक शहाजी दळवी, माजी सरपंच बापूसो ननवरे , दादासो खर्डे , बंडू पुंडे , शिवराम पुंडे, सुरेश खर्डे , किसन पुंडे , सणसवाडीच्या सरपंच सुवर्णा दरेकर, ग्रा सदस्या अनिता तळोले , सुरखा पुंडे, शकुंतला तळोले , मोहन पुंडे, अमोल पुंडे 'चेअरमन देवस्थानचे अध्यक्ष आनंदराव तळोले ' चे .भाऊसो तळोले, बाबुराव ढगे,प्राचार्य अनिल शिंदे , भास्कर पुंडे, सुधिर पुंडे , उद्योजक दता पाचुंदकर , निलेश ननवरे, कृषीरत्न रघुनाथ शिंदे , पी .एस. पुंडेसो , सचिव सुदाम तळोले , माजी डीवायएसपी भाऊसो ननवरे , लहू तळोले , रतनराव तळोले, केंदळे सर, धुमाळ सर , अंकुश खर्डे , वामन तळोले , संतोष तळोले , युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थीत होते . पी. एस पुंडेसो ,रघुनाथ शिंदे ' बंडु पुंडे ,सुवर्णा दरेकर , दादासो खर्डे, बबनदा शिदे व शिक्षकांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या . शेखर दादा यांनी शुभेच्छा देताना खादी प्रमाणे खाकीला बदनाम करू नका व या गावातून असेच मोठे अधिकारी तयार होवोत अशी महागणपती चरणी प्रार्थना केली सत्कारास उतर देतांना बापाच्या कष्टाचे भान व जाण असल्याने विक्रांत तळोले यास गहीवरून आले . उपस्थिताना महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली .