सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील शेती क्षेत्रामध्ये नावलौकिक असणारी विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नागेश जगन्नाथ गव्हाणे पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी विमल ज्ञानेश्वर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे,
शिरूर तालुक्यामध्ये नावलौकिक असणारी या संस्थेची कारकीर्द चांगली असून कोरेगाव भीमा गावांमधील मोठी शेती क्षेत्र असणाऱ्या तसेच वडिलोपार्जित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या संस्थेमार्फत अतिशय चांगल्या सुविधा दिल्या जातात, खेळीमेळीच्या वातावरणात झालेले या निवडणुकीमध्ये गावांमधील सर्व ज्येष्ठ नागरिक, संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले,
यावेळी माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे, मा पो पाटील विक्रमअण्णा गव्हाणे, सरपंच विक्रम गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, विजय गव्हाणे, अरविंद गव्हाणे, नितीन गव्हाणे, गणेश गव्हाणे, योगेश गव्हाणे, कांतीलाल फडतरे, ग्रा स केशव फडतरे, अनिकेत गव्हाणे, मनीषा गव्हाणे, वंदना गव्हाणे, कैलास सोनवणे, रवींद्र गव्हाणे, संपत गव्हाणे, मा चेअरमन संजय फडतरे, देविदास गव्हाणे, प्रकाश खैरमोडे, राजेंद्र गव्हाणे, चेतन गव्हाणे, विनोद साळुंखे, भरत गव्हाणे, अविनाश गव्हाणे, दशरथ गव्हाणे, प्रमोद शिंदे, दीपक गव्हाणे, ऋषिकेश गव्हाणे, विनायक गव्हाणे, डॉक्टर स्वप्निल गव्हाणे, उमेश गव्हाणे, समीर इनामदार, बापू दौंडकर, राजेंद्र शिंदे, दत्तात्रय गव्हाणे, संस्थेचे संचालक पंडित फडतरे, सारिका गव्हाणे, बबुशा ढेरंगे, अशोक गव्हाणे, महादेव फडतरे, अनिल गव्हाणे, अशोक नाबगे, प्रवीण गव्हाणे, बाळासाहेब वाडेकर, रामदास कांबळे, संतोष माकर, सर्जेराव गव्हाणे, नितीन गव्हाणे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,
वर्गमित्र वढू बुद्रुक चे माजी सरपंच अनिल शिवले, भरारी न्युजचे संपादक सुनील भंडारे पाटील, समीर इनामदार, पत्रकार विजयराव लोखंडे यांनी संस्थेच्या कार्यालयामध्ये भेट घेऊन सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या,
या निवडीनंतर गावामध्ये भंडार उधळण करत गावामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तसेच नागरी सत्कार करण्यात आला, निवडीनंतर गव्हाणे यांनी सांगितले की संस्थेच्या माध्यमातून शेतकरी वर्गासाठी शासनाच्या वतीने जाहीर करण्यात येणाऱ्या योजनांचा तळागाळातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे, शेतीसाठी मिळणारे विविध प्रकारचे कर्ज देऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करणार आहोत,